इतिहासात प्रथमच १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार : उद्योग मंत्री उदय सामंत

इतिहासात प्रथमच १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार : उद्योग मंत्री उदय सामंत.  मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्योग , नगरविकास , एमएमआरडीए , सिडिको या विभागाने दाव्होस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आज पर्यंतच्या इतिहासात प्रमथमच १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे. असे उद्योगमंत्री तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले . दाव्होस येथून परत आल्यानंतर उद्योगमंत्री श्री सामंत यांनी वांद्रे (पुणे ), मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते . उद्योग मंत्री
म्हणाले कि मागील दोन वर्षात साडेसात लाख कोटी सामंजस्य करार झाले होते,यात  पहिल्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटी तीन लाख ७० हजार कोटी करार करण्यात आले होते.