नवीन गुंतवणुकीत महाराष्ट्राने रचला विक्रम १६ लाख कोटी गुंतवणूक-१५लाख  नवीन रोजगार दाव्होस २०२५ : महाराष्ट्रात मोठ्या गुंतवनिकेचे वारे

दाव्होस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री नाम . देवेंद्रजी फडणवीस, उद्योगमंत्री नाम . उदयजी सामंत व अन्य मान्यवर. मुंबई : दाव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल १५ लाख ७०हजार  कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार केलेले आहेत . यातील ९८ टक्के गुंतवणूक परदेशी असून या करारांमुळे १५ लाख ९५ हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे . यामध्ये विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून,त्यांच्या  गुंतवणुकीमुळे राज्यात औद्योगिक विकासाबरोरबरच रोजगार निर्मितीची मोठीं  संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दाव्होसहुन आयोजित दृकश्राव्य  पत्रकार परिषदेत या करारांबाबत सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी नमूद केले कि, गेल्या वर्षी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या करारांपैकी ९५ टक्के अंमलबजावणी यशस्वी झाली आहे. या वर्षीच्या परिषदेत कृषी प्रक्रिया, सौर ऊर्जा, सौरक्षण, विद्युत वाहने अशा विविध क्षेत्रामध्ये गुंतुवानिकीचे करार झालेलं आहेत. राज्यातील गडचिरोली सारख्या दुर्गम भागापासून शहरी विभागापर्यंत समतोल विकास साधण्याचा प्रयत्न असल्याने फडणवीस यांनी सांगितले.