महाराष्ट्र चेंबर आणि जिल्हा प्रशासन व इटालियन ब्रँड प्राडा

महाराष्ट्र चेंबर आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जागतिक सहकार्याची खात्री.
जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडा कंपनीची टीम कोल्हापुरात आली होती. त्यांनी कोल्हापुरी चपलांचा दर्जा, डिझाईन आणि पारंपरिक कौशल्य याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने आयोजित बैठकीत कोल्हापुरी चपलांचे जागतिक बाजारपेठेशी जुळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.प्राडा टीमने कोल्हापुरी चपलांचे ऐतिहासिक महत्त्व, स्थानिक कारागिरांचे कौशल्य आणि दर्जेदार उत्पादन यांचे कौतुक केले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष , ललित गांधी यांनी चपलांची माहिती दिली आणि संभाव्य ब्रँड भागीदारीसाठी प्रस्ताव मांडला.भविष्यात चपलांचे स्थानिकत्व आणि गुणवत्ता टिकवून ठेवत जागतिक ब्रँडसोबत भागीदारी करून कोल्हापुरी चपलांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.प्राडा टीम कोल्हापुरी चपलांचे दर्जा पाहून भारावले.