केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांची भेट

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी दौऱ्यानिमित्त आलेले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले, व चेंबरच्या कामकाजा संबंधी चर्चा केली.या भेटीमध्ये पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष रमाकांत मालु ,गव्हर्निंग काउन्सिल सदस्य रमेश अरवाडे उपस्थित होते.
विशेषता: वस्त्रोद्योग समितीच्या माध्यमातून या क्षेत्राच्या विकासासाठीच्या विविध उपक्रमांची चर्चा करून वस्त्रोद्योगासंबंधी लवकरच राष्ट्रीय परिषद घेणार असल्याची माहिती देऊन सदर परिषदेच्या उद्घाटनाचे आमंत्रण श्री गिरीराज सिंह यांना दिले.