एक देश - एक निवडणुकीमुळे उद्योग-व्यापारावरील परिणामाचा अहवाल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने द्यावा - पी. पी. चौधरी

एक देश - एक निवडणुकीमुळे उद्योग-व्यापारावरील परिणामाचा अहवाल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने द्यावा - पी. पी. चौधरी
संयुक्त संसदीय समिती ने दिली जबाबदारी
मुंबई ः एक देश-एक निवडणुकीसाठी प्रस्तावित घटना दुरस्ती संदर्भात विविध घटाकांचे अभिप्राय व चर्चेसाठी मुंबई दौर्यावर आलेल्या संयुक्त संसदीय समिती ने या घटना दुरस्तीमुळे उद्योग-व्यापार व अर्थव्यवस्थेवर होणार्या परिणामांमुळे सविस्तर अहवाल देण्याची जबाबदारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ला दिल्याची माहीती चेंबर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.सोमवार दि. 19 मे रोजी संयुक्त संसदीय समितीपुढे या विषयावर सादरीकरणासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ला आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी सादरीकरण केले व वारंवार होणार्या वेगवेगळया निवडणुकांमुळे उद्योग-व्यापार - अर्थकारण शेती या घटकांवर होणार्या प्रतिकुल परिणामांवरील अहवाल सादर केला.यामध्ये प्रामुख्याने धोरणात्मक अडथळे, व्यापार-उद्योगावरील आर्थिक परिणाम कर्मचारी रजांमुळे उत्पादनावर होणार परिणाम आदर्श आचारसंहितेमुळे येणारे अडथळे आदी बाबीवरील हरकती विशद करून एक राष्ट्र - एक निवडणुक या संकल्पनेबाबत पाठींबा दर्शवला.संयुक्त संसदीय समितीमध्ये अध्यक्ष खासदार पी.पी. चौधरी यांनी महाराष्ट्र चेंबर चा प्रारंभिक अहवाल महत्वपुर्ण असल्याचे नमुद करून याविषयी सविस्तर अहवाल अपेक्षित असल्याचे सांगितले व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर ने येत्या सहा महिन्याच्या आत उद्योग-व्यापार-कृषि उद्योग व अर्थव्यवस्था यावरील अनुकुल-प्रतिकुल परिणामांच्या सविस्तर विश्लेषणासह अहवाल सादर करावा अशी सुचना केली.अध्यक्ष ललित गांधी यांनी संयुक्त संसदीय समिती ने दिलेल्या निर्देशनानुसार अहवाल देण्याची ग्वाही दिली. यावेळी झालेल्या चर्चेत खासदार परशोत्तम रूपाला, मोहम्मद बशीर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनुराग ठाकुर यांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र चेंबर च्या प्रतिनिधि मंडळात उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, श्रीकृष्ण परब सेक्रेटरी जनरल निलाक्षी अय्यर यांचा सहभाग होता. याप्रसंगी बॉलीवुड तर्फे मधुर भांडारकर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे आशिषकुमार चौहाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फोटो कॅप्शन ः खास. पी.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीप्रसंगी खास. सुप्रिया सुळे, खास. अनुराग ठाकुर, खास. धर्मेंद्र यादव, मधुर भांडारकर, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, श्रीकृष्ण परब, निलाक्षी अय्यर व अन्य मान्यवर.