हॉंगकॉंग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलच्या साउथ ईस्ट एशिया आणि एशिया विभागाच्या प्रमुखांनी महाराष्ट्र चेंबरला भेट दिली

२४ एप्रिल २०२५ रोजी हॉंगकॉंग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलच्या साउथ ईस्ट एशिया आणि एशिया विभागाच्या प्रमुखांनी महाराष्ट्र चेंबरला भेट दिली. अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली द्विपक्षीय व्यापार संधींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.या चर्चासत्रात वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, तसेच संगीता पाटील, करुणाकर शेट्टी, कांतीलाल चोपडा, शंकर शिंदे आणि संजय सोनावणे उपस्थित होते.दोन्ही बाजूंच्या उद्योग क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर बल देण्यात आले.यामध्ये नवनवीन उद्योग, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींवरही चर्चा करण्यात आली.