उद्योग संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या विशेष चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील उद्योग जगताच्या अपेक्षा सादर केल्या.

मुंबई ः महाराष्ट्र हे उद्योगवाढीसाठी व गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असणारे राज्य असुन उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गतीने काम करणारे सरकार असल्याने राज्यात विक्रमी नवीन गुंतवणुक येऊ घातली आहे. या नवीन गुंतवणुकीमुळे
15 लाख नवीन रोजगार निर्मितीबरोबरच महाराष्ट्र वेगवान प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांनी केले. झी-24 तास तर्फे मुंबई येथे आयोजित उद्योग संमेलनाप्रसंगी ते बोलत होते.
    राज्याचे कौशल्य विकास मंत्री नाम. मंगलप्रभात लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कौशल्य विकासामुळे उद्योग व आर्थिक प्रगती होणार असल्याचे सांगुन युवकांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करावेत असे सांगितले. तसेच कौशल्य विकासाचा वेग वाढविण्यासाठी राज्यातील आय.टी.आय. चा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी औद्योगिक संघटना व उद्योजकांचे सहकार्य घेऊ असे सांगितले.
    उद्योग संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या विशेष चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, डीक्की चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, ग्लोबल कोकण चे संजय यादवराव, एसएमई चेंबर चे चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील उद्योग जगताच्या अपेक्षा सादर केल्या.
    झी-24 तास च्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ
कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह मिलिंद कांबळे, संजय यादवराव, चंद्राकांत साळुंखे यांना उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने उद्योग विकासासाठी केलेल्या वैशिष्ट्यपुर्ण कामगिरीबद्दल प्रदान केलेला हा पुरस्कार उद्योगमंत्री नाम. उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री
नाम. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते व झी-24 तास चे संपादक
कमलेश सुतार यांच्या उपस्थितीत ललित गांधी यांनी स्विकारला.
    या संमलेनासाठी महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, आशिष पेडणेकर, वरीष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, श्रीकृष्ण परब, रमाकांत मालु, गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य संजय लुणावत, शरद सुर्यवंशी, संदीप सोमवंशी, रंजना एरणकर यांच्यासह व्यापार, उद्योग जगतातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    झी-24 तास चे सहसंपादक प्रशांत सोनार यांनी सत्रसंचालन केले.