महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आबिटकर यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राच्या सरकारने राज्यात पेपर कप उत्पादन अथवा विक्रिवर बंदी घातलेली नसुन असा कोणताही आदेश राज्य शासन स्तरावर निघाला नसल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
पेपर कप च्या आतील कोटींगमुळे वापरल्या जाणार्या प्लास्टीक पासून कॅन्सर होऊ शकतो अशा आशयाच्या बातम्या काही वाहीन्यांनी दाखवल्यामुळे असा संभ्रम निर्माण झाला आहे. अशा प्रकारचे संभ्रम दुर व्हावेत यासाठी महाराष्ट्र चेंबर पुढाकार घेईल अशी ग्वाही ही ललित गांधी यांनी दिली.
पेपर कप उत्पादकांच्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या मुख्यालयात ललित गांधी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व अशा अपप्रचारामुळे हजारो युवकांचा रोजगार जाईल. उद्योग बंद पडतील व कोट्यावधी रूपयांचे नुकसान होण्याची भीती ही व्यक्त केली. महाराष्ट्रातील काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी पेपर कप उत्पादनावर बंदी घालणारे परिपत्रके जारी केली आहेत. ज्यामुळे अनेक कर्ज घेतलेले युवक आणि छोटे उद्योगकरी चिंता व्यक्त करत आहेत. या आदेशात नमूद केलेली उत्पादने प्रत्यक्षात पेपर कपमध्ये वापरली जात नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी पेपर कप संघटनेचे पदाधिकार्यांसह आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सद्या उत्पादीत होणारे पेपर कप व आतील कोटींगचे साहीत्य हे प्रमाणित फुड ग्रेड असुन कॅन्सर धोका नसलेले आहेत.
जनतेमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने याविषयातील तज्ञांची समिती नेमुन याविषयी अभ्यास अहवाल सादर करावा अशी मागणी ललित गांधी यांनी नाम. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी पेपर कप उत्पादकांची भुमिका समजुन घेतली व आरोग्य विभागातर्फे बैठक घेऊन तज्ञ समिती नेमण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
पेपर कप अथवा अन्य उत्पादनांवर बंदीचा कोणताही प्रस्ताव आलेला नसुन असा काही प्रस्ताव असल्यास महाराष्ट्र चेंबर च्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल अशी ग्वाहीही आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी दिली.
शिष्टमंडळात सिध्दार्थ सोमाणी, तुषार बंब, संतोष झंवर, जालान, सोमवंशी, सचिन धुत यांचा समावेश होता.